‘विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाठी घोषित केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करा’

मुंबई: सरकारने नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २२ हजार १२२ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजची कालबद्धरितीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

तसेच बैठकीत चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा( डीपीआर) सादर करण्यात आला. पुढच्या आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन महाविद्यालायच्या कामाला वेग देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ठ केले.

-Ads-

या बैठकीस राज्यमंत्री मदन येरावार, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)