मुंबई हल्ल्यातील संबंधीतांवर कडक निर्बंध लागू ठेवा : पॉम्पेओ

अमेरिकेचे विदेश मंत्री पॉम्पेओ यांचे आवाहन 

हल्ल्याशी संबंधीत लोकांची माहिती देणाऱ्यांना पाच दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस जाहीर 

-Ads-

वॉशिंग्टन: मुंबईवर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हे हीन दहशतवादी कृत्य होते. या अनुषंगाने संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संबंधीत संघटनांवर जे निर्बंध घातले आहेत ते पाकिस्तानसह अन्य देशांनी अत्यंक काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केले आहे.

मुंबई हल्ल्याच्या घटनेला आज दहा वर्ष पुर्ण झाली त्यानिमीत्त येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी अमेरिकेच्या न्याय विभागाने मुंबईवर झालेल्या 2008 च्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि त्यात सहभागी झालेल्या व्यक्तींविषयी माहिती देणाऱ्यांना 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस जाहीर केले आहे. पॉम्पओ म्हणाले की मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे अनेक सूत्रधार आणि या कटात सहभागी झालेल्या अनेक व्यक्ती अजून कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहिल्या आहेत.या हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत वेदनादायी आहे असे ते म्हणाले. या हल्ल्याशी संबंधीत असलेल्या सर्वांनाच न्यायापुढे खेचणे आवश्‍यक आहे असेही त्यांनी नमूद केले.

या घटनेबद्दल आम्ही सर्व अमेरिकन नागरीकांच्या वतीने भारताविषयी सहानुभुती व्यक्त करीत आहोत, आम्ही या बाबतीत सर्व भारतीयांच्या पाठिशी उभे आहोत असेही ते म्हणाले. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात एकूण 166 नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यात एकूण सहा अमेरिकन नागरीक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)