इंधन महागल्याचा प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम

नवी दिल्ली: इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर परिणाम होऊ लागला आहे. एअर इंडियाच्या तोट्यात आणखी वाढ झाली आहे. त्याचबरोबर इंडिगो कंपनीचा नफा तळाला गेला आहे. त्यातच आता जेट एअरवेज समोरही प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

जेट एअरवेज कंपनीची आर्थिक परिस्थिती खालावल्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे शुक्रवारी या कंपनीचा शेअर तब्बल 7 टक्‍क्‍यांपर्यंत कोसळला. कंपनीची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली असून खर्चामध्ये लक्षणीय कपात न केल्यास पुढच्या 60 दिवसांत त्यांच्या तिजोरीत खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारावरही गदा आल्याने कंपनीत अस्वस्थता पसरलीय. जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांच्यासह व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना याबाबात माहीत देण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन महिन्यांनंतर कंपनी चालवणे शक्‍य नसल्याचे व्यवस्थापनाने आम्हाला सांगितले आहे.खर्चाला कात्री लावण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातीलच, पण वेतन कपातीची घोषणा करून ते मोकळे झालेत. आता ही परिस्थिती काही काल-परवा उद्‌भवलेली नक्‍कीच नाही. पण, आतापर्यंत कंपनीने आम्हाला याबाबत जराही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावरील विश्‍वास डळमळीत झालाय, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आपल्याला अंधारात ठेवले गेल्याबद्दल, बऱ्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला ई-मेलवरून जाब विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उत्तरच मिळाले नाही.

खर्च कमी करण्याच्या सूचना आल्यानंतर जेटमध्ये वेतन कपातीसोबतच कर्मचारी कपातही सुरू झाल्याचेबोले जात आहे. अभियांत्रिकी विभागातील काही कर्मचाऱ्यांना सुट्टीवर जाण्याचे निरोप पाठवण्यात येत आहेत. तसंच, कर्मचाऱ्यांचा पगार 25 टक्‍के कमी केल्यास दरवर्षी 500 कोटी रुपये वाचणार असल्याचे सांगत कंपनीने नोकरदारांच्या खिशातही हात घातला आहे. नरेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली जेटच्या व्यवस्थापकांची टीम मुंबई कार्यालयात आली होती. दोन वर्षांसाठी वेतन कपात केली जाईल आणि त्याची कुठलीही परतफेड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितलंय.

कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ आणि इंडिगोची मुसंडी, या कारणांमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गेल्या सहा वर्षांत कंपनीचा विस्तारच होऊ शकला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)