Impact – फिटनेस + चॅरिटी… वॉक-जॉग-रन

सध्या मस्त हिवाळा सुरू आहे, पुण्यातली गुलाबी थंडी तर औरच! त्यात सकाळी लवकर उठून कोणी बाहेर जाऊन फिरून ये असं म्हणतात तेव्हा आपण पांघरूणात आणखी शिरतो. पण हेच तुम्ही रोज चालायला जात असाल तर यात खंड पडून देत नाही आणि नित्यनेमाने मॉर्निंग वॉक करायला जाताच.

सध्या तंत्रज्ञाच्या सोबत आपण अपग्रेड झालोय आणि मोबाईल आपल्याला आपण किती व्यायाम केला, चाललो किंवा पळालो, इत्यादी सांगतो (गूगल फिट आणि तत्सम अॅप्स). या तुमच्या चालण्याने किंवा पळण्याने समाजातल्या काही दुर्लक्षित घटकांना मदत मिळणार असेल तर… तुम्ही तुमचा व्यायाम करून स्वस्थ तर राहणारच सोबत सामाजिक कार्य! आहे की नाही दुग्धशर्करा योग.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता तुम्ही म्हणाल ते कसं? आपण चालायचंही आणि आपलेच पैसे मदत/देणगी म्हणून द्यायची का? तशी मदत आपण वर्षात कधीतरी करतोच… तर तुमच्या मंथली बजेटला धक्का न पोहचवता तुम्ही हे करू शकता. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की तुमच्या स्मार्टफोनवर खारिलीं अॅप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा. तुमचं नवीन लॉगइन बनवा आणि तुम्हाला हवं असलेले सामाजिक कारण निवडा आणि चालायला लागा. प्रती किलोमीटर 10 रुपये चॅरिटी होणार त्यामुळे तुम्ही जितके कि.मी. चालणार तितके अधिक तुम्ही मदत करू शकता. जर तुम्ही नुकतंच चालायला सुरू केलं असेल किंवा करणार असाल तर तुम्हांला एक सकारात्मक प्रेरणा म्हणून हे अॅप नक्की उपयोगी पडेल.

– प्रशांत खोत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)