तपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा 

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: बिद्रे-गोरे कुटुंबियांची मागणी

सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे आम्हाला नकोच 

कोल्हापूर – बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील तपासी अधिकारी एसीपी अजय कदम यांना तात्काळ हटवण्यात यावे. तसेच गुन्ह्याची अंतिम सुनावणी होईपर्यंत एसीपी संगीता अल्फान्सो यांची तपासी अधिकारी म्हणून नेमणुक करावी, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली आहे. दरम्यान सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे आम्हाला नको असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून झाला असल्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. तसेच ही केस अधिक स्ट्रॉंग होण्यासाठी आणखी काही पुरावे शोधणे गरजेचे आहे. या केससंदर्भांत अश्विनीचे पती राजू गोरे यांनी पोलिसांच्या तपासाबद्दल अनेक वेळा उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केल्या आहेत. या याचिकांमूळेच आम्हाला तपासाची माहिती समजते, असे राजू गोरे यांनी म्हटले आहे.

-Ads-

या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे केली होती. परंतु आता सरकारी वकील म्हणून ते नको आहेत. उज्ज्वल निकम हे मूळचे जळगाव रहिवाशी आहेत आणि या प्रकरणातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा देखील जळगावचा आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून आम्हाला नको आहेत, असे गोरे यांनी सांगितले.

सध्याचे तपास अधिकारी एसीपी अजय कदम यांना तपासातून तात्काळ हटवावे आणि त्यांच्या जागी या गुन्ह्याची अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत तत्कालीन तपस अधिकारी एसीपी संगीता अल्फान्सो या अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी देखील आनंद बिद्रे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)