मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती तात्काळ करा

मराठा क्रांती मोर्चाची झेडपी साईओंकडे मागणी

सातारा –
जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती तात्काळ करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेने रोस्टर विभागीय आयुक्तांना पाठविले असून ते मंजूर होताच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडल्यामुळे त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे निर्दशनास आणून देण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने पदोन्नती देण्याबाबत पत्र काढून सूचना केल्या आहेत. मात्र, राज्यातील उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर, लातूर अहमदनगर, रत्नागिरी आदी जिल्ह्यांमध्ये पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सातारा जिल्हा परिषदेने मात्र, मागील चार वर्षात प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत असून तो सहन करण्यात येणार नाही. तसेच बिंदू नामावलीची काटेकोर अंमलबजावणी करून कोणत्याही संवर्गावर अन्याय न होता व खुल्या प्रवर्गाच्या जागांना धक्का न पोहचता मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचे रोस्टर तात्काळ व काटेकोरपणे तपासून मंजूर करण्यात यावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर रोस्टरनुसार एखाद्या प्रवर्गाच्या रिक्त जागा नसतील तर प्रवर्गात जागा नसताना नवीन भरतीने किंवा आंतरजिल्हा बदलीने नियमबाह्य पध्दतीने पदे भरली गेली तर मराठा क्रांती मोर्चा ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत केंद्र प्रमुखांचे पदे भरण्यात आली असून रोस्टर प्रक्रिया पूर्ण होताच मुख्याध्यापक पदाच्या पुनर्स्थापनेचा आदेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यावेळी संदीप पोळ, बापू क्षीरसागर, विवेक कुराडे-पाटील, जयेंद्र चव्हाण, साईराज कदम, अविनाश कदम यांच्यासह सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)