पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी आयएमएफचाही इशारा

वॉशिंग्टन – पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची नाजूक बनली असून धाडसी आर्थिक निर्णय घेतल्याशिवाय या देशाला आर्थिक दृष्ट्या तगणे आता अवघड बनले आहे असा इशारा आयएमएफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. सध्या पाकिस्तानकडे केवळ 8 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकाच परकीय गंगाजळीचा साठा आहे. त्यातून केवळ दीड महिना आयातीचा खर्च भागवला जाऊ शकतो. या सरकारने आयएमएफ कडे गेल्या ऑगस्ट मध्येच बेलआऊट पॅकेजसाठी मागणी केली आहे.

पाकिस्तानची आणिबाणीची स्थिती लक्षात घेऊन आयएमएफने त्यांना सहा अब्ज डॉलर्सची मदत जाहीर आहे. त्या देशाच्या आर्थिक विकासाचे सारे गणितच बिघडले असून त्यांना आता मोठ्या आर्थिक सुधारणा आणि काटकसरीच्या उपाययोजना केल्याशिवाय तग धरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांना 1980 पासून आत्तापर्यंत तेरा वेळा बेलआऊट पॅकेज अंतर्गत मदत केली आहे.

गेल्याच आठवड्यात नाणेनिधीने त्यांना सहा अब्ज डॉलसचे पॅकेज दिले असून त्यातील एक अब्ज डॉलर्स त्यांना तातडीने दिले जाणार आहेत तर उर्वरीत निधी त्यांनी पुढील तीन वर्षांत दिला जाणार आहे. आर्थिक सुधारणा आणि अन्य उपाययोजना करून सुद्धा त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो असे नाणेनिधीने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here