अनधिकृत जाहिरात फलकबाज आता काळ्या यादीत

तब्बल पाच वर्षांनंतर प्रशासनाचा स्थायी समितीसमोर अभिप्राय

पुणे – महापालिकेच्या कारवाईनंतरही शहरातील अनधिकृत जाहिरात फलक उभारण्याचे प्रमाण वाढतच असल्याने अशाप्रकारे नियमबाह्य जाहिरात फलक लावणाऱ्या व्यावसायिकांना या पुढे काळ्या यादीत टाकले जाणार आहे. त्यासाठीचा अभिप्राय तब्बल 5 वर्षांनी आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे कोट्यवधीचे उत्पन्न बुडवून राजरोसपणे फलकबाजांना जरब बसण्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका हद्दीत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली जाते. उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवरील 2014 मध्ये दिलेल्या निकालानंतर आकाशचिन्ह विभागाने ही कारवाई अधिकच तीव्र केली आहे. विशेष असे, की अनधिकृत जाहिरात फलक उभारणाऱ्यांविरोधात मालमत्ता विद्रुपीकरणाअंतर्गत फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येत आहे. जाहिरात व फलक नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत फलक काढून जप्त करण्यात येतात. ही कारवाई नियमितपणे होत असतानाही शहरातील अशा फलकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे वास्तव आहे. यापुढे अशा व्यावसायिकांना दोन वेळा समज देणे, त्यानंतर जाहिरात फलक उभारल्यास संबधितास काळ्या यादीत टाकण्यास आणि त्याने अन्यत्र परवानगी घेउन उभारलेल्या जाहिरात फलकांची परवानगी रद्द करून महापालिकेकडे जमा असलेले डिपॉझिट जप्त करण्याचे आदेश सप्टेंबर 2017 मध्ये आयुक्तांनी दिले आहेत. अनधिकृतपणे जाहिरात फलक उभारणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव मार्च 2013 मध्ये स्थायी समितीपुढे आला होता. जाहिरात परवानगी हा आर्थिक विषय असल्याने स्थायी समितीने यासंदर्भात त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविला होता. प्रशासनाने मुळ प्रस्तावानुसार तब्बल 5 वर्षांनंतर अभिप्राय स्थायी समितीला पाठविला आहे.

शहराच्या हद्दीत उभारल्या जाणाऱ्या जाहिरात फलकास प्रतिवर्षी 222 रुपये प्रति चौ.फू. या दराने परवाना शुल्क आकारले जाते. परंतु, इमारत आवारात किंवा टेरेसवर जाहिरात केली जात असल्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असून न्यायालयाच्या रोषासही सामोरे जावे लागते. यावर आळा बसावा, यासाठी कारवाई केलेल्या ठिकाणी जाहिरातदाराकडून पुन्हा जाहिरात फलक उभा करता येऊ नये, यासाठी संबधित जाहिरात फलक धारकास काळ्या यादीत टाकण्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)