आयएल-एफएसची बचत मोहीम

महागड्या कार आणि फर्निचर विकण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून कर्जाच्या ओझ्याखाली वावरत असणारा आयएल ऍण्ड एफएस ग्रुप चर्चेत आहे. सध्या यावर सरकारने आपले संचालक मंडळाची नेमणूक करून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ग्रुपवर प्रचंड कर्ज असल्याने त्याची परतफेड करण्यासाठी अनेक मार्गाचा वापर करत असल्याचे वातावरण सध्या सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता कंपनीकडे असलेल्या जवळपास 36 आलिशान कारची लवकरच बोली लावण्यात येणार आहे. यातून काही प्रमाणात रक्कम जमवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या संदर्भात लवकरच एक योजना तयार करून कारच्या विक्रीसाठी 18 डिसेंबर रोजी बोली लावण्यात येणार आहेत. यात एकूण 36 अलिशान कारची विक्री केली जाणार आहे. तर अशा आणखीन कार आयएल ऍण्ड एफएस ग्रुपकडे असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकूण विक्री करण्यात येणाऱ्य़ा कारमध्ये यात 8 ऑडी, 6 बीएमडब्ल्यू दोन जॅग्वॉर आणि एक लेक्‍सस 2 मर्सिडीज बेन्झसह आदी गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यांच्यासह ग्रुपच्या ताफ्यात एकूण 72 अलिशान कारचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.

लग्झरी गाड्यासह इतर वस्तूची विक्री येणाऱ्य़ा काळात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी असणारी गेस्ट हाऊसचा समावेश आहे. तर यातील फर्निचर व इतर महत्त्वाच्या साहित्यांचा ही यात समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)