श्रीगणेशच्या हृषीकेश मोकळचे आयआयटी ऍडव्हान्स परीक्षेत यश

कोपरगाव -देशातील 23 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी मधील आय आयटी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या आयआयटी ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये श्रीगणेश ज्युनिअर कॉलेज कोऱ्हाळे येथील 12 वी सायन्सचा विद्यार्थी ऋषिकेश नंदराम मोकळ याने आयआयटी ऍडव्हान्स परिक्षेत पालकांची 1949 रॅंक मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. ही परीक्षा देशभरातील 1 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी आयआयटी ऍडव्हान्स परिक्षेत पात्र ठरले आहेत.

शैक्षणिक प्रगतीच्या वाटेवर प्रा. विजय शेटे दिशादर्शक असल्याची भावना ऋषिकेशचे वडील नंदराम मोकळ यांनी व्यक्त केली. ऋषिकेशने कौशल्यापूर्ण अभ्यास करून यश प्राप्त केले असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी सांगितले. प्रा.रोहन क्षीरसागर, प्रा.नंदलाल आहेर, प्रा. योगेश फटांगरे, प्रा. अजित राऊत, उपप्राचार्य प्रा. प्रवीण दहे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, सतिष वैजापूरकर, उपाध्यक्ष संदीप चौधरी , विश्वस्थ भरत शेटे, रवी चौधरी, प्राचार्य प्रा. रियाज शेख, प्राचार्य प्रा. रामनाथ पाचोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा.बापू पुणेकर यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)