‘आयफा’ २०१८ चा इरफान खानला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार

थायलंड मध्ये झालेला ‘आयफा पुरस्कार 2018’ सोहळा जोरदार धमाक्यात पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार ‘हिन्दी मिडीयम’ सिनेमासाठी इरफान खानला मिळाला आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला. विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलु’ सिनेमाने बेस्ट फिल्मचा किताब पटकावला. फिल्म ‘न्यूटन’ साठी डायरेक्टर अमित मसुरकर यांना ‘सर्वोत्कृष्ट स्टोरी’ पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण जोहर आणि रितेश देशमुख यांनी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)