इफकोच्या सदस्यपदी डॉ. रूपाली विघ्ने

शेवगाव: शेवगावच्या जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. रुपाली बाळकृष्ण विघ्ने यांची नवी दिल्ली येथील इफको संस्थेवर नाशिक विभागातून आमसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

इंडियन फर्टीलायझर लिमिटेड-इफ्को या संस्थेवर नाशिक विभागातून आमसभा सदस्य म्हणून निवड प्रक्रियेसाठी नाशिक येथे निवडणूक झाली. यात डॉ. विघ्ने यांची निवड झाली आहे. यासंदर्भात सचिव लक्ष्मी विघ्ने यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्था ही शंभर टक्के महिला सदस्य असलेली तब्बल 401 महिलांची एकमेव सहकारी संस्था आहे. मार्गदर्शक बाळकृष्ण विघ्ने यांच्या मार्गदर्शना खाली संस्थेच्या स्थापनेपासून इफको कंपनीच्या उत्पादनांची वितरक म्हणून काम करत आहे. आतापर्यंत किमान पाच कोटी रुपयांच्या वर इफकोच्या उत्पादनांची विक्री केली असून, संस्थेकडे कंपनीची कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही.

याशिवाय नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शासकीय हमी भावांतर्गत तूर, हरभरा, मूग, उडीद आदी कडधान्य खरेदीचेही कार्य ही महिला संस्था गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत सक्षमपणे करत आहे. इफको कंपनीला यावर्षी 52 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संपूर्ण देशभरातून निवड झालेल्या 1000 आम सभा सदस्यांपैकी 5 टक्के म्हणजे 50 महिलांना सदस्यत्व देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या वर्षी कंपनीने घेतला आहे. त्यानुसार देशभरातून 50 महिलांची आमसभा सदस्यपदी निवड होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)