नाकावरून अध्यक्षपद मिळत असेल तर चीनमध्ये घरोघरी अध्यक्षपदे वाटावी लागतील : भाजप मंत्र्याचा प्रियंका गांधींवर निशाणा

गुजरात – देशभरामध्ये सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. अशातच आज भाजपचे केंद्रीय मंत्री मंसुख मांडवीया यांनी प्रियंका गांधी वढेरा यांच्यावर खोचक टीका केली. गुजरात येथील आनंद येथे एका जाहीर सभेत बोलताना मांडवीया प्रियंका गांधी वढेरा यांना उद्देशून म्हणाले,”जर एखाद्याचे नाक आपल्या आजी प्रमाणे असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला जर अध्यक्षपद मिळत असेल तर चीनमध्ये प्रत्येक घराघरात अध्यक्षपद वाटावे लागतील.”

दरम्यान प्रियंका गांधी वढेरा यांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेश केल्यापासूनच त्यांचा चेहरा त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्याशी मिळताजुळता असल्याने त्यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली जात आहे. अशातच आज भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून प्रियंका यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)