तुम्ही एक आमदार फोडाल तर आम्ही दहा फोडू : खरगे

कर्नाटकात भाजपला कॉंग्रेसचे खुले आव्हान

बंगळुरू- कर्नाटकात भाजपकडून कॉंग्रेस आघाडीचे सरकार फोडण्याचे प्रयत्न अद्यापही जारी असले तरी कॉंग्रेसनेही आता पुरेशी तयारी केली असल्याची माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांनी आमचे सरकार पाडूनच दाखवावे त्यांनी आमचा एक आमदार फोडला तर आम्ही त्यांचे दहा आमदार फोडण्याची तयारी केली आहे असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशात आघाडीचे सरकार चालू शकत नाही हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी लोकसभा निवडणुकीपुर्वी कर्नाटकातील आघाडीचे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. संघ आणि भाजपचे लोक संघटीतपणे हा प्रयत्न करीत असले तरी आम्ही आता आमचा पक्ष फुटू देणार नाही.

आमच्या तेथील मंत्र्यांनी आपला पक्ष मजबूत ठेवण्याचे सर्व उपाययोजले आहेत असे ते म्हणाले.आमदारांना धमकावण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे असे ते म्हणाले. भाजपचे ऑपरेशन कमळ कोमेजले आहे पण त्यांचे प्रयत्न अद्यापही जारीच आहेत असे ते म्हणाले. काहींना प्रलोभन दाखवून, काहींना पैशाचे अमिष दाखवून आणि काहींना धमकाऊन फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप खरगे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)