जर आम्ही त्यांना लवकर बाद करू शकलो तर सामना खूप रंगतदार होईल- अजिंक्य रहाणे

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीमालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली. त्यातच भारताचा पहिला पूर्ण डाव हा अवघ्या ३५.२ षटकात १०७ धावांवर आटोपला. भारताच्या एकही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करता अली नाही.
भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला भारताच्या सुमार फलंदाजी नंतर देखील विजयाच्या अशा आहेत. पत्रकार परिषदेत  बोलताना त्याने असे सांगितले की, “आम्ही जर लवकर इंग्लंडला सर्वबाद करू शकलो तर सामना खूप रंगतदार अवस्थेत पोहचेल आणि आम्ही या मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील करू.”
पहिला कसोटी सामना भारतीय संघाने ३१ धावांची गमावला होता. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसाने धुवून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी कसोटी सामना सुरु झाला होता.  त्यात भारतीय संघाला उत्तम फलंदाजी करता आलेली नसून इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी होतील की नाही या यावर सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)