ब्रिस्बेन: स्पर्धात्मकतेचा अनुभव घेण्यासाठी मैदानावर शाब्दीक वादावादी करण्याची गरज नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मांडले होते. मात्र, कोहलीच्या या मतावर प्रति वक्तव्य येत असून ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आपले मत मांडले असून यावेळी तो म्हणाला की, विराट कोहली ऑस्ट्रेलियात येऊन शांत राहिला तर सर्वांना नवलच वाटेल. तो एक चांगला स्पर्धक असून शाब्दिक वादावादित तो यशस्वी सुद्धा होतो असेही कमिन्सने यावेळी सांगितले आहे.
भारतीय कर्णधाराबरोबर शाब्दीक वादावादी झाली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार असून विराटला अन्य खेळाडूंपेक्षा वेगळी वागणूक देणार नाही असेही कमिन्सने यावेळी नमूद केले. तुम्हाला दोन्ही बाजूंकडून आवेशयुक्त, उत्कंठावर्धक क्रिकेट पाहायला मिळेल. मात्र, भारतीय संघाच्या गत दौऱ्यात जसा तणाव झाला होता तशा पद्धतीचा तणाव यावेळी नसेल असेही कमिन्सने सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा