शस्त्रसंधी भंग केल्यास पाकला योग्य ती शिक्षा देऊ 

लष्कराच्या उत्तर विभागप्रमुखांचा इशारा 

उधमपुर – पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग केल्यास किंवा कोणतीही आगळीक केल्यास त्यांना त्वरीत योग्य ती शिक्षा केली जाईल असा इशारा लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी दिला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या संबंधात बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की आमचा त्यांना संदेश अतिशय स्पष्ट आहे. तुम्ही आगळीक केली तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊन शिक्षा केली जाईल. लष्कराला राष्ट्रहित जपायचे आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली कृती लगेच केली जाईल आणि त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल असे ते म्हणाले.

-Ads-

प्रत्यक्ष ताबा रेषेवर गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराच्या प्रकारात भारतीय हद्दीतील तीन जवान शहीद झाले तर लष्कराला मदत करणारा एक मदतनीस कामी आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या या स्निपिंगच्या प्रकाराविषयी आम्ही त्यांच्याकडे तातडीने निषेध नोंदवला आहे. आणि त्याचवेळी त्यांना चोख प्रत्युत्तरही दिले आहे असे त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

पाकिस्तानच्या बाजूकडून भारतीय हद्दीत अजूनही घुसखोरीला प्रोत्साहन दिले जात आहे असे त्यांनी नमूद केले. पण प्रत्यक्ष ताबारेषेनजिक चौफेर भारतीय जवान तैनात करण्यात आले असून त्यांच्याकडून हे घुसखोरीचे प्रकार तातडीने हाणून पाडले जात आहेत. लष्कराच्या उत्तर विभागाकडून या भागात स्थानिक मुलांसाठी 45 सद्‌भावना शाळा चालवल्या जात आहेत. तेथे त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास अभ्यासक्रमही शिकवले जात आहेत. त्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी एक हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तेथे नेमण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी या मुलाखतीत दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)