निवडणूक काळात मोदींवरील चित्रपट प्रदर्शित झाल्यास खळखट्याक !! मनसेने दिला इशारा

मुंबई – सध्या निवडणूक आचार संहिता सुरू आहे. या काळात मोदींवरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई करावी अशी आमची मागणी आहे. पण आचार संहितकडे दुर्लक्ष करून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याच्या विरोधात उग्र निदर्शने करून खळखट्याक केले जाईल असा इशारा मनसे चित्रपट कर्मचारी संघटनेने दिला आहे. संघटनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनीच हा ईशारा दिला आहे.

या संबंधात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे की गेल्या वर्षी मोदी व भाजपने अक्षयकुमार यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा आणि पॅडमॅन या चित्रपटांना आर्थिक मदत दिली होती. चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळीसुद्धा मोदींवरील चित्रपटासाठी आपले योगदान देत आहेत असा समाज पसरवण्यासाठी मोदींवरील हा चित्रपट ऐन निवडणूक काळात प्रदर्शित केला जात आहे. हा त्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. भाजपच्या गलिच्छ राजनीतीचा मनसे निषेध करते असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमित खोपकर यांनीही हा चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)