कार्यकर्त्यांना गृहीत धराल तर अडचणीत याल

कार्यकर्त्यांना गृहीत धराल तर अडचणीत याल

रात्र वैऱ्याची आहे राजे सावध पावले टाका क्षणाक्षणाला भुरळ पाडणारे आणि संकटात ओढवून घात करणाऱ्या फैजा सज्ज झाल्या आहेत. वेळ, काळ बघूनच मारा करा अन्यथा आपला घात करण्यासाठी विरोधकांचा दारुगोळा सज्ज आहे. कोण आपले आणि कोण परके हे ओळखा. विश्‍वासावर लगेच विसंबून राहू नका. निवडणुकीच्या रणांगणात विजय आपलाच आहे. हे जाणणांऱ्याना कळून चुकले आहे. तरी ही आपला पाडाव करण्यासाठी गनिमी काव्याचे डावपेच आखले जात आहेत. “सावध राहा, सज्ज राहा’ राजे प्रत्येक पाऊलो पाऊली धोका पोचविणारा काळ उभा आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारीचा घोळ अखेर तू.तू…मे…मे करीत सुटला. श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांच्या गळयात लोकसभा उमेदवारीची माळ पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घातली. अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या या मतदार संघातील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत जनतेने मोठी उत्सुकता होती. श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मागील दोन निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिकंल्या आहेत. उदयनराजे भोसले याची क्रेझ मतदार संघात असल्याने यावेळी ही ते मोठया फरकाने निवडून येतील असा विश्‍वास राजकीय वर्तुळात व्यक्‍त केला जात आहे. हे जरी सत्य असले तरी मागील काही वर्षात जिल्हयातील राजकारणात बऱ्याच काही घडामोडी घडल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी स्वकिय पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची कोंडी करण्याची कोणतीच संधी सोडली नाही.

खंडाळा येथील औद्योगिक वसाहतीमधील कामगार आंदोलनाचा वाद असो अथवा आनेवाडी टोलनाका येथील राडा असो जिथे जिथे उदयनराजे अडचणीत येतील तेथे तेथे त्यांना अडचणी उभ्या केल्या आहेत. जिल्हयाच्या राजकारणात स्वत:चे वेगळेपण जपणारे उदयनराजे भोसले यांनी मात्र येणाऱ्या प्रत्येक संकटाना सामोरे गेले आहेत. परिणामी जिल्हयातील नेत्यानी उदयनराजे भोसले यांच्या कार्यपध्दतीबाबत पक्षाध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे कान भरले. परंतू जिल्हयातील राजकारणातील बारकावे व माहिती असणारे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र कानाडोळा करत खा. उदयनराजे भोसले यांच्यावर विश्‍वास ठेवला.

अनेकदा उदयनराजेच्या तक्रारीचा पाढा वाचून सुध्दा शरद पवार यांनी उदयनराजेंना सन्मानाची वागणूक दिली. अखेर पक्षाध्यक्षांचे पाठबळ उदयनराजेंना असल्याचे लक्षात येताच जिल्हयातील सर्व आमदारांनी व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येवून पक्षाध्यक्षांवर दबाब वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात समर्थकांनी ही सोबत घेतले. पण मुरब्बी शरद पवार यांनी अखेरपर्यत उदयनराजेंना साथ देत सातारची उमेदवारी उदयनराजेंना दिली. घडलेल्या घटना घडामोडी पाहाता या पुढील काळात उदयनराजे भोसले यांना राजकारणातील प्रत्येक पाऊल हे आता जपून टाकावे लागणार आहे. स्वकियामधील विरोध व विरोधकांशी झुंज यापुढील काळात द्यावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत गृहीत धरुन राजकारण कराल तर घात होईल हे तितकेच सत्य आहे.
-श्रीरंग काटेकर, सातारा

राजे सावध राहा…

राज्याच्या व देशाच्या राजकारणात ज्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. ते राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार याचे सातारा जिल्हयातील राजकिय घडामोडी बारकाईने लक्ष असते. सातारच्या राजघराण्यातील राजकीय वाद त्यांनी सोडविला आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना झुकते माप देताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना ही सबुरीचा सल्ला देवून तुर्ततरी वादाला पूर्णविराम दिला आहे. तरी पण समर्थकामधील वाद अद्याप मिटलेले नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत कोण कोणासाठी काम करणार हे सांगणे कठीण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)