विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित झाला तर प्राचार्य, कुलसचिव जबाबदार

पुणे – उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबाबत महाडीबीटी पोर्टलवर माहिती न मिळाल्यामुळे शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याच विद्यापीठाच्या कुलसचिवांना व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना नुकसानीला जबाबदार धरणार आहे.

पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून तत्काळ पुढे फॉरवर्ड करण्यासाठीच्या सूचना अनेकदा महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, बहुसंख्य विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांनी लॉगिनवर एकही ऑनलाइन अर्ज प्रलंबित राहणार याची खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. वारंवार दूरध्वनीद्वारे महाविद्यालयांना त्याच्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांची लाभाची फी मंजूर न झाल्यामुळे आर्थिक शिष्यवृत्ती न मिळाल्यास त्यास प्राचार्य जबाबदार राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिष्यवृत्ती योजनांचे लाभ वितरण सुरू झाले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईल लॉगिन करून त्यांच्या अर्जांची स्थिती तपासावी. विद्यार्थ्यांना एसएमएस देखील प्राप्त होणार आहेत. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा लाभ त्यांचे आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात देण्यात येणार आहे. विनाआधार पर्यायाचा वापर करून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल लॉगिन करून आधार क्रमांक अपडेट करून घ्यावा, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी विद्यापीठ व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)