पक्षाने उमेदवारी दिल्यास खासदारकी ताकदीने लढू

ना. नरेंद्र पाटील : आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न

आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना कोयना धरणाच्या पुनर्वसनाच्या संदर्भात प्रश्‍न विचारण्यात आले होते. साठ वर्षे झाली तरी कोयनेचा पुनवर्सनाचा प्रश्‍न अद्याप मिटलेला नाही. यावर मी केवळ सहा वर्षे विधानपरिषदेचा आमदार होतो. माझ्या काळात वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे प्रश्‍न मांडले. मात्र त्याला आता यश आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वांग मराठवाडी धरणग्रस्तांचा प्रश्‍न मार्गी लावला. खूप मोठी रक्कम या खातेदारांना मिळाली आहे. मात्र कोयनेचे प्रश्‍न का प्रलंबित आहेत ते ज्यांनी मंत्रीपद भोगले त्यांना विचारा, असा खोचक सवाल विक्रमसिंह पाटणकर यांचे नाव न घेता केला.

राज्यात निवडणुकीसाठी भाजपाला पोषक वातावरण आहे तर शिवसेना व भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचा विजय या ठिकाणी निश्‍चित आहे. सातारा मतदारसंघ शिवसेना की भाजप लढविणार याचा निर्णय उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री घेतील. पक्षाने उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढू असा विश्‍वास यावेळी नरेंद्र पाटील यांनी व्यक्‍त केला.

कोयना पुनवर्सनाचा प्रश्‍न गंभीर आहे. पुनवर्सन महामंडळाचे अध्यक्ष माधव भंडारी आहेत. तरीसुद्धा या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढू तसेच आठ दिवसात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)