पालघरमध्ये विजय मिळवताना भाजपची दमछाक का झाली?- शिवसेना

मुंबई: भाजपने नुकताच सांगली आणि जळगाव महापालिकेवर विजय मिळवला. मात्र निवडणुकीत विजयोत्सव साजरा न करण्यासाठी सेनेने भाजपला बजावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची मते बदलत असल्याचे शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.

“हा विजय भाजपच्या २०१९ च्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे? अगदी पालघरमधील पोटनिवडणुकीतही विजय मिळवताना भाजपची जी प्रचंड दमछाक झाली ती कशाची नांदी म्हणायची? “असा प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनातून विचारण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभूत करून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला. गेल्या तीस वर्षांत कधी न झालेला महापालिकेतील सत्ता बदल विरोधी पक्षांच्या चांगलाच जिव्हारी आला आहे.

जळगाव महापालिकेत तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचे वर्चस्व संपले आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागा मिळवता आल्या. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)