किमान उत्पन्न हमी योजना व्यवस्थित लागू केल्यास क्रांतीकारी ठरेल – रघुराम राजन

नवी दिल्ली – काँग्रेसची किमान उत्पन्न हमी योजना ही चांगली असून ही योजना व्यवस्थित पद्धतीने लागू केल्यास ती क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास काँग्रेसने उत्पन्न हमी योजना लागू करू अशी घोषणा केली होती. यावर बोलताना रघुराम राजन यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

काँग्रेसने घोषित केलेली ही योजना चांगली असून ती लागू झाल्यास देशातील गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल असे रघुराम राजन म्हणाले. परंतू या योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था इतका खर्च सोसू शकेल का यावर शंका उपस्थित केली आहे. सध्याच्या सरकारने अगोदरच अनेक योजनेद्वारे ३.३४ लाख कोटींचे कर्ज वितरित केले आहे, त्यामुळे जर किमान उत्पन्न हमी योजना लागू केल्यास पुन्हा वार्षिक ३.४ लाख कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सध्याची आर्थिक परिस्थिती ही गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी २५ मार्च रोजी किमान उत्पन्न हमी योजना जाहीर केली होती. ज्या महिलांचे मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे, अशा महिलांचे उत्पन्न १२ हजार करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा होणार आहेत. देशातील ५ कोटी कुटुंबांना म्हणजे एकूण २५ कोटी लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचे राहुल यांनी सांगितले होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)