पराभवाचे दुःख कवटाळत बसलो तर शेतकरी हतबल झाला असता- राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथं संपन्न

कोल्हापूर – ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो तर ती ज़खम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायच असत. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच ढळला असेल पण मी ज़र निवडणुकीच्या दुखाला कवटाळून बसलो असलो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता. यामुळे पराभव विसरून कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेटटी यांनी आंबा येथे झालेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ता अभ्यास शिबीरात केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमिमांसा व विचारमंथन.केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व गावगाडा तसेच त्याचे परिणाम.स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी.आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी राजकीय तसेच आंदोलनाची दिशा या विविध विषयावरती चर्चा झाली.

यावेळी बोलताना राजू शेटटी म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास २००० हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला.शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकर्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांच प्रमाण वाढत आहे.यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा.

यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत आलेले यश अपयश ,चळवळीची पुढील दिशा , संघटना , पक्ष , महिला आघाडी व युवा आघाडीची संघनात्मक बांधणी या विषयावर परखड मत व्यक्त करत आपल्या भुमिका स्पष्ट केल्या. या शिबिरास जिल्हाध्यक्ष भगवान काटे , पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांचेसह पक्षाचे ,संघटनेचे,युवा आघाडी व महिला आघाडीचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)