गाजरांचे वाटप पूर्ण झाले असेल तर शेतकऱ्यांची ही क्रूर थट्टा थांबवा- सुप्रिया सुळे

नांदेड: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. मात्र काही तासांच्या आतच बँकेने पैसे परत करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिले आहेत. ही समस्या केवळ नांदेड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बँकांनी शेतकऱ्यांकडून पैसे परत मागितल्याचे समजते आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “किसान सन्मान योजनेची जुमलेबाजी एक दिवस देखील टिकली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देऊन ते परत घेताय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्याकडील गाजरांचे वाटप पूर्ण झाले असेल तर शेतकऱ्यांची ही क्रूर थट्टा थांबवा. देण्याची दानत नसेल तर किमान पोकळ गप्पा मारु नका.

-Ads-

गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ केला होता. यावेळी देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केल्याचा दावा करण्यात आला होता. यानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही ८ हजार १८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित केले. मात्र नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संचालक सुकन्या यांनी एका मेलद्वारे १ हजार २१०० शेतकऱ्यांचे पैसे परत घेण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, त्यामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)