भाजपाने लोकसभा जिंकल्यास ती देशाची शेवटची निवडणूक 

सुशीलकुमार शिंदे यांची टीका

सोलापूर  – नरेंद्र मोदी यांनी जर लोकसभा निवडणूक जिंकली तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल, अशी जळजळीत टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. देशातील सत्ताधारी हे राक्षस असून मोदी यांच्यात हुकूमशहा ठासून भरला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा येथे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन मेळाव्यात ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी त्यांनी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच माझे दिल्लीत “दुकान’ चालते, असेही कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले.
सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तालुक्‍यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वडाळा येथे पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)