ठरलं तर मग ! शरद पवार माढामधूनचं लढणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार लोकसभा निवडणूक लढणार म्हणून जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार माढामधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

पुण्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी माढामधून निवडणूक लढवावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाने पवारांना विनंती केली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अजून झाली नाही, आमच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभा निवडणूक लढवतील, असा विश्वास पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

दरम्यान, माढा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांना आवाहन दिले आहे. भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, अशी इच्छा महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here