शिवसेनेने गुलाल तर, राष्ट्रवादीने उधळला भंडारा

पिंपरी – मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी बालेवाडीतील क्रीडा संकुल येथे पार पडली. मतमोजणी झाल्यावर मावळ मतदार संघातून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल तर, शिरुर मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण्यावर भर दिला.

गुरुवारी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे मतमोजणी सुरु झाल्यावर मावळातून श्रीरंग बारणे तर, शिरुर मतदार संघातून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती. मावळातून पार्थ यांना तर शिरुर मतदार संघातून शिवाजी आढऴराव यांना ही आघाडी रोखता आली नाही. परिणामी घटत्या मताधिक्‍याचे रुपातंर पराभवात झाले. विजय निश्‍चित झाल्याचा अंदाज येताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर बारणे येताच गुलालाची उधळण केली. तर, अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी भंडारा उधळण्यावर भर दिला. यामुळे दोन पक्षाचे दोन वेगळे रंग मतमोजणी केंद्राबाहेर दिसत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here