राजीव सक्‍सेना माफीचा साक्षीदार झाल्यास त्याला ईडीचा आक्षेप नाही

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील कथित दलाल राजीव सक्‍सेना जर माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असेल, तर त्याला आपल्याकडून कोणताही आक्षेप नसेल, असे सक्‍तवसुली संचलनालयाकडून आज दिल्लीतल्या न्यायालयात सांगण्यात आले. राजीव कुमारला या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी देण्याबाबत आणि साक्षीदार करण्याबाबतच्या आदेशांवर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी या प्रकरणाचा निकाल 25 मार्चपर्यंत राखून ठेवला.

“ईडी’चे विशेष सकारी वकिल डी.पी. सिंह आणि एन.के.मट्टा यांनी सक्‍सेनाच्या माफीचा साक्षीदार होण्याने तपास करायला “ईडी’ला मदतच होईल, असे न्यायालयात सांगितले. सक्‍सेनाने केलेल्या जामीनासाठीच्या अर्जाला “ईडी’ने विरोध केल्या नाही. त्यामुळे न्यायालयाने वैद्यकीय कारणासाठी सक्‍सेनाला जामीन मंजूर केला.

सक्‍सेना साक्षीदार बनावा यासाठी “ईडी’ मदत करत आहे. माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी सक्‍सेनाने दर्शवली आहे, असे “ईडी’चे वकिल ऍड. सामवेद वर्मा यांनी न्यायालयात सांगितले. दुबईस्थित “युएचवाय सक्‍सेना’ आणि “मॅक्‍ट्रीक्‍स होल्डींग्ज’ या दोन कंपन्यांचा संचालक राजीव सक्‍सेनाविरोधात “ईडी’ने 3,600 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)