राहुल गांधींची प्रचार सभा म्हणजे कॉंग्रेस उमेदवाराच्या पराभवाची गॅरंटी : योगी आदित्यनाथ 

बिकानेर: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कोणत्याही मतदार संघातील प्रचार सभा म्हणजे कॉंग्रेस उमेदवाराच्या पराभवाची गॅरंटी आहे. त्यामुळे कोणाही उमेदवाराला आपल्या मतदार संघात राहुल गांधी यांची प्रचार सभा नको असते, असे योगी आदित्यनाथ यांनी चुरू जिल्ह्यातील रतनगड मतदार संघात भाजपा उमेदवार अभिनेश महर्षी यांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितले. नेतृत्वच नसल्याने कॉंग्रेस पक्षाकडून कोणतीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. हे मी वा इतर कोणी नाही, तर कॉंग्रेसचे नेतेच म्हणत आहेत, असेही योगी पुढे म्हणाले.

केंद्रात असो वा राज्यात, भाजपा सरकारने समृद्धी आणली आहे आणि विकासदर वाढवला आहे. भाजपाने केलेल्या कामाला कोणताही पर्याय नाही. उत्तर प्रदेशात झालेला बदल उघड असून राजस्थान सरकारने अनेक विकास कामे केली असून साडेतीन लाख युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

-Ads-

2.47 लाख मतदार असलेल्या रतनगड मतदार संघात तिरंगी लढत आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार आणि माजी मंत्री राजकुमार रीनावा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)