पटेलांचा पुतळा होतो मग राम मंदिराचा कायदा का होत नाही? : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला भाजपला सवाल

मुंबई: राम मंदिर विषयावरून आता राष्टीय स्वयंसेवक संघच भाजपच्या विरोधात मैदानात उतरला आहे. जर गुजरात मध्ये सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जातो तर अयोध्येतील राम मंदिरासाठी कायदा का केला जात नाही असा सवाल संघाने भाजपला विचारला आहे. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसबाळे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की गेले कित्तेक वर्ष हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र बेंचही स्थापन केले आहे तरीही यावरील सुनावणी का पुर्ण होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

होसबाळे हे संघाचे सहसरकार्यवाह आहे. विश्‍वहिंदु परिषद आणि संबंधीत संघटनांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते म्हणाले की कॉंग्रेस नेते व माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात आपले म्हणणे सादर करताना भारतीय पुरातत्व विभागाला अयोध्येतील त्या जागी मंदिराचेच अवशेष सापडले आहेत असे म्हटले होते. पण कोर्ट आता म्हणते आहे की हा विषय अग्रकम्राने सुनावणीला घेता येणार नाही. हा विलंब असह्य आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)