पाकिस्तानने एक बॉंब टाकल्यास भारत 20 टाकून पाकिस्तानला संपवून टाकील – मुशर्रफ

नवी दिल्ली – पाकिस्तानने एक बॉंब टाकल्यास भारत 20 टाकून पाकिस्तानला संपवून टाकील,असा इशारा पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी दिला आहे. एका प्रसिद्धी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत जनरल परवेझ मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सबंध अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहचले आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये परमाणू युध्द होणार नाही. आणि समजा झालेच, आणि युद्धात पाकिस्तानने एक परमाणू बॉंब टाकला, तर भारत 20 परमाणू बॉंब टाकून पाकिस्तानला संपवून टाकील. हे व्हायला नको असेल, तर त्यावर एकच उपाय आहे, असे सांगून मुशर्रफ पुढे म्हणाले, की पाकिस्तानलाच भारतावर 50 परमाणू बॉंब टाकून हल्ला करावा लागेल. पण तसे करणे खरोखरच शक्‍य आहे का? तर या प्रश्‍नाचे उत्तर आहे “नाही’ असेही त्यांनी मान्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना मुशर्रफ यांनी सांगितले, की जैश ए मोहम्मदने माझ्यावरही हल्ला केला होता. मौलाना मसूद अजहरने माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्यामुळे काश्‍मीर प्रश्‍न सुटण्याची काहीही शक्‍यता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)