मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर देश 50 वर्षे मागे जाईल – निर्मला सीतारामन

बंगळुरू – येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर देश 50 वर्षे मागे जाईल असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. भाजपला पुर्ण बहुमत मिळाले पाहिजे. जर भाजपला बहुमत मिळाले नाही तर देशाचे नुकसान होईल असे त्या म्हणाल्या.

नवोदित मतदारांना त्यांनी भाजपलाच निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की देशात जर पुन्हा जुन्याच विचारांचे सरकार सत्तेवर आले तर नवोदित पिढीला ते हानीकारक ठरेल. देशाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात मोदींसारखे नेतृत्व भारताला मिळालेले नाही असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. गेल्या पाच वर्षात मोदींनी एकही दिवस सुट्टी न घेता खूप काम केले आहे असे त्या म्हणाल्या. मोदींच्या काळात भ्रष्टाचाराला पुर्ण पायबंद घातला गेला असे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)