किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभारणार – सुनील राऊत

मुंबई – ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभारणार, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी आहे. सुनील राऊत हे मुंबईतील विक्रोळी चे आमदार असून खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत.

किरीट सोमय्या यांना शिवसेनेचाच नाहीतर त्यांच्या स्वकीयांचा देखील विरोध आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास भारतीय जनता पक्षाला नुकसान होऊ शकते, असे मत सुनील राऊत यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना, “एकवेळ धनुष्य आणि कमळ यांच्या साठी एकत्र काम करेन पण ज्यांनी आमच्या मंदिरावर टीका केली त्यांना कसा पाठिंबा देणार? त्यामुळे किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभारणार. अपक्ष उभारायचे की पक्षाकडून याचा निर्णय पक्ष घेईल.” असे राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)