‘जर भारतीय वायुसेनेचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असेल तर त्यांनी…’ : असादुद्दीन ओवैसी

संग्रहित छायाचित्र..

पाकिस्तानतर्फे आज भारतावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याला भारतातर्फे चोख प्रतिउत्तर देण्यात आले असल्याने पाकिस्तानचा भारतीय सैन्य दलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न चांगलाच फसला आहे. आज सकाळी भारतीय वायूसीमेमध्ये प्रवेश करणारे पाकिस्तानचे लढाऊ विमान PAF F-१६ हे भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाडण्यात आले आहे. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाईदरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता आहे.

दरम्यान, पाकिस्तानतर्फे भारताचे बेपत्ता विमान व वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे वृत्त आल्याने भारतातून या वैमानिकाबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी देखील भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता वैमानिकांबाबत चिंता व्यक्त केली असून जर तो वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असेल तर पाकिस्तानने त्याच्यासोबत मानवतापूर्वक व्यवहार करावा असे मत ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे. यावेळी ओवैसी यांनी पाकिस्तानला गेनेवा करारातील तिसऱ्या कलमाचा दाखल दिला असून यामध्ये शत्रू सैन्याच्या बंदी करण्यात आलेल्या जवानाला मानवतापूर्वक वागणूक देण्याची तडजोड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत मिग २१ लढाऊ विमान आणि वैमानिक बेपत्ता असल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

https://twitter.com/asadowaisi/status/1100700004690227201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)