मी घराणेशाहीच्या विरोधात असून माझी मुलंबाळ लढली तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचं?- गडकरी

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. लोकसभा मतदारसंघांत ही प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहे.अशातच एकीकडे नितीन गडकरी यांनी नागपूरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत विरोधकांवर टीका केली, तर दुसरीकडे जनतेला येत्या निवडणुकीसाठी आव्हान केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विरोधी पक्षांवर घराणेशाहीचा आरोप लावत तिरकस टीका केली. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी, “आपण घराणेशाहीच्या विरोधात असून आमची मूलंबाळ देखील निवडणुकाच लढली तर मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं?” असा प्रश्न त्यांनी विरोधकांचे नाव न घेता विचारला. या सभेमध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना आपणास प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान करत, “मला एवढ्या प्रचंड मतांनी विजयी करा की येथून पुढे माझ्यासमोर कोणी उमेदवार उभा राहण्याचे धाडस करता कामा नये. मी यावेळी देखील प्रचंड बहुमतांनी निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे मात्र मला मिळणारी मत दुप्पट करण्याची जबाबदारी तुमची आहे.” असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)