दोषी ठरलो तरी राजीनामा देणार नाही : नेतन्याहू

भ्रष्टाचार प्रकरणात इस्त्रायलच्या पंतप्रधानांची भूमिका

जेरूसलेम: आपल्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे त्यात आपण जरी दोषी ठरलो तरी आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार नाही अशी विक्षिप्त भूमिका इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. इस्त्रायल मध्ये येत्या एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. तो पर्यंत आपण या पदावर कार्यरत राहुन आपले उत्तरदायित्व पार पाडणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. बेंजामिन नेतन्याहू हे सध्या ब्राझीलच्या दौऱ्यावर आहेत. तेथून ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेताना त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराची एकूण तीन प्रकरणे दाखल असून त्यांची या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यातील काही प्रकरणात त्यांच्यावर खटला दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याची गरज नसली तरी विरोधकांकडून त्यांच्यावर त्यासाठी दबाव येण्याची शक्‍यता आहे. ते म्हणाले की आपण असल्या कोणत्याही दबावाला बळी पडण्याची शक्‍यता नाही आणि आणि जरी खटला दाखल झाला तरी राजीनामा देण्याचे कायदेशीर बंधन आपल्यावर नाही. मुळात यापैकी कोणत्याही प्रकरणात आपण दोषी नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आपल्यावरील आरोपांमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली असल्याचा दावा आपल्याला मान्य नाही. येत्या निवडणुकीत आपलाच पक्ष पुन्हा निवडून येईल असा दावाही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)