बारामती भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन – अजित पवार

बारामती – ‘बारामती भाजपने जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’ असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. पण ‘भाजपला बारामती जिंकता आली नाही तर, त्यांनी निवृत्ती घ्यावी’ असं सुद्धा अजित पवार यांनी म्हंटल आहे.

बारामती मधील वाकडेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत अजित पवार यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी प्रत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तिसऱ्या टप्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील 14 मतदारसंघांसह देशातल्या एकूण 117 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या दिग्गाजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)