सेना-भाजपची सत्ता कोणी घालवू शकत असेल, तर ते फक्त आम्हीच ! -प्रकाश आंबेडकर

 विकल्या गेलेल्या  माणसांना आमच्याकडे थारा नाही : प्रकाश आंबेडकर

घराणेशाही ने आपले चारित्र्य तपासावे

डिकसळ: कॉंगेस पक्षासोबत युती करावी असे काही नाही परंतु कॉंगेस पक्षाला ३७ ठिकाणी लोकसभेला उमेदवार मिळत नाहीत. कॉंगेस पक्ष वाचला पाहिजे असे आम्हाला वाटते. त्यांना जर वाचायचे नसेल तर आम्हालाही त्यांना वाचवायला इंटरेस्ट नाही. जे पक्ष विकावू आहेत त्यांच्याशी आम्ही कधीच युती करणार नाही. वेळच आली तर बहुजन वंचित आघाडी सर्वच्या सर्व जागा लढवेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी भिगवण (ता.इंदापूर) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आंबेडकर पुढे म्हणाले, राजकारणामध्ये सध्या घराणेशाही वाढतच चालली असून त्यांनी आपले चारित्र्य तपासावे. महाराष्ट्रतून सेना आणि भाजपला धनगर जात मतदान करते त्यावेळी १२% मतदान हे आमच्याकडचे जाते त्यामुळे आमची कुटुंबशाही संपली. सेना भाजपची सत्ता कोणी घालवू शकत असेल तर ते फक्त आम्हीच घालवू असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.

बाबीर देवस्थान रुई (ता.इंदापूर) येथे यात्रेनिमित्त जात असताना आंबेडकर यांनी भिगवणला कार्यकर्त्याची भेट घेतली. यावेळी अँड विजयराव मोरे, सिकंदर शेख, करीम बागवान, रामचंद्र इरवाड, अँड महेश देवकाते, नवनाथ पडळकर,सचिन बोगावत, शरद चितारे, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, संपत बंडगर,संदीप वाघमारे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
954 :thumbsup: Thumbs up
1255 :heart: Love
36 :joy: Joy
122 :heart_eyes: Awesome
126 :blush: Great
7 :cry: Sad
8 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)