अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामाचा खात्मा केला तर भारतही करू शकते – जेटली 

नवी दिल्ली – भारतीय हद्दीत पाकिस्तान विमाने घुसल्याने दोन्ही देशांचे संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. अशातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पाकिस्तानात घुसून अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने मारले होते. तर भारतही हे करू शकतो, असे वक्तव्य जेटली यांनी केले आहे.

अरुण जेटली म्हणाले कि, अमेरिकेचे पथक पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा करु शकते तर भारतही हे करु शकतो. सध्याच्या परिस्थितीत सर्व काही शक्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर जेटली यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. भारतही पाकिस्तानमध्ये घुसून मोठ्या स्तरावर जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100672888011673601

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)