व्हिडीओतील व्यक्ती ओळखा ; एक लाख रूपये मिळवा

कॉंग्रेसची ऑफर: नोटाबंदीनंतरच्या अदलाबदलीवरून आक्रमक पवित्रा
अहमदाबाद – नोटाबंदीनंतर झालेल्या नोटांच्या अवैध अदलाबदलीशी संबंधित व्हिडीओंवरून कॉंग्रेसने आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. अशाच एका व्हिडीओचा आधार घेत पक्षाने त्यातील व्यक्तीची ओळख सांगणाऱ्यास एक लाख रूपयांचे बक्षीस देण्याची तयारी दर्शवली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची शुक्रवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ क्‍लीप दाखवली. तो व्हिडीओ अहमदाबादमध्ये चित्रित करण्यात आल्याचा दावा करून ते म्हणाले, व्हिडीओतील व्यक्तीने 5 कोटी रूपये मुल्याच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 3 कोटी रूपयांच्या नव्या 2 हजार रूपये मुल्याच्या नोटा घेतल्या. संबंधित व्यक्ती बहुधा भाजपच्या नजीकची आहे. ती व्यक्ती भाजपची सदस्यही असू शकते. ती व्यक्ती इतरांसमवेत बेहिशेबी रकमेची अवैध अदलाबदल करण्याचे रॅकेट चालवत होती. त्या प्रक्रियेत राजकारणी, बॅंकर्स आणि दलाल असावेत. त्या अदलाबदलीत 40 टक्‍क्‍यांपर्यंत कमिशन कमावण्यात आले, असा आरोप सिब्बल यांनी केला. आधीच समोर आलेल्या त्या व्हिडीओवरून चौकशी करण्याची तसदी भाजप सरकारने घेतली नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)