आयडिया-व्होडाफोन ग्रामीण भागावर भर देणार

मुंबई: व्होडाफोन इंडिया आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्या आपले स्वतंत्र ब्रॅण्ड बाजारात आणण्याची शक्‍यता आहे. परंतु कोणताही नवीन ब्रॅण्ड घाईगडबडीत चालू न करता शांतपणे बाजारातील व्यवहाराची पडताळणी केल्यानंतर हा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे 
दोन्ही कंपन्यांचे स्वतंत्र ब्रॅण्ड तयार करत असताना ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना वेगळा ब्रॅण्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. शहरातील ग्राहकांना पोस्टपेडची सुविधा विशेष ऑफर देऊन चालू केली जाणार आहे. तर ग्रामीण क्षेत्राकरिता वेगळा ब्रॅण्ड देण्यात येणार आहे. टेलिकॉम विभागाने या अटी मान्य करतच दोन्ही कंपन्याच्या विलीनीकरणासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. दोन्ही कंपन्याच्या विलीनीकरणानंतर देशातील मोठी टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी होण्याकडे वाटचाल चालू राहणार आहे. ग्राहकांची नोदणी संख्या 43 कोटीपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)