व्यक्तिमत्व : एक आयडिया…(भाग-2)

व्यक्तिमत्व : एक आयडिया…(भाग-1)

-सागर ननावरे

काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन वर एक जाहिरात प्रसारित केली जायची. त्या जाहिरातीतील शब्दपटलाने जनमानसावर चांगलाच ताबा मिळवला होता. “एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया” असे शब्द त्या जाहिरातीतून दाखविले जात होते. मुळात आयडिया हा इंग्रजी भाषेतील शब्द. मराठीतील कल्पना,युक्ती या शब्दांसाठी इंग्रजीत वापरला जाणारा शब्द. आपल्या दैनंदिन संवादात आपण या आयडिया शब्दाचा अनेकदा उच्चार करीत असतो. असो आयडिया काय अन कल्पना काय, तसा त्याचा अर्थ एकच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या दिवशी दोन्ही जबाबदार व्यक्तींना बोलावून रिपोर्टस मागवले. पहिल्या व्यक्तीने एका दिवसात 1 हजार नग पॅकिंग झाल्याचे सांगितले. तर दुसऱ्या व्यक्तीने मात्र 3 हजार नग पॅकिंग झाल्याचे सांगितले. व्यवस्थापकाने दोघांना कामाच्या पद्धतीबाबत विचारणा केली. तेव्हा पहिल्या व्यक्तीने प्रत्येक साबणाचा बॉक्‍स स्वतः हाताने चेक करून पुढे पाठविल्याचे सांगितले.

दुसऱ्याने मात्र एक कल्पना वापरली असल्याचे सांगितले. असेंब्ली लाईनवरून साबण पुढे जात असताना त्याने मध्यभागी एक मोठा पंखा लावला. त्यामुळे जे खोके तांत्रिक दोषामुळे रिकामे पुढे जात होते ते हवेमुळे लाईनवरून खाली पडत असे आणि त्यामुळे कसलेही जास्त कष्ट न घेता, अगदी साध्या सोप्या कल्पनेने उत्पादनक्षमता वाढली गेली.

पुढे त्या व्यक्तीला सीनियर मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि त्याने वापरलेली कल्पना कंपनीच्या प्रत्येक युनिटमध्ये राबविली गेली. वरील घटनेत दोघांकडेही विपुल अनुभव असूनही एकाचे श्रेष्ठत्व ठरले ते त्याच्या कल्पकतेमुळे. एकाने मेंदूरूपी खोके रिकामेच ठेवले, तर दुसऱ्याने ते आपल्या कल्पकतेने समृद्ध केले. आणि त्या कल्पकतेला योग्य न्याय मिळाला.

आयुष्यात अनेक आव्हाने किंवा समस्या आपल्यासमोर आ वासून उभ्या असतात. अशा वेळी आपण तणावाखाली जातो. जास्त कष्ट किंवा पैसे खर्च करावे लागणार याने चिंतित होतो. परंतु आपल्या डोक्‍यात येणारी एक कल्पना आपल्यासाठी वरदान ठरू शकते याची आपल्याला कल्पना नसते.

प्रत्येक माणसात कल्पकता दडलेली असते. परंतु ज्यांना ती कल्पकता प्रत्यक्षात आणता येते असे लोक हमखास यश मिळवतात. कल्पकता व्यक्तीला आणि व्यक्तींचा समूह असलेल्या उद्योगांना हमखास मोठं करत असते. कल्पकतेमुळेच व्यक्तीला आपल्या प्रगतीत सातत्य राखता येत असते.

आज उद्योगजगतात तंत्रज्ञानाने कितीही मोठी प्रगती केली असली, तरी तिला मानवाची कल्पकताच कारणीभूत आहे हे विसरून चालणार नाही. शोध आणि त्याचा बोध या दोन गोष्टी कल्पकतेला चालना देत असतात. एखादी कल्पना सुचली आणि ती यशस्वी ठरली नाही तर…? अशा वेळेस थांबायचे नाही. त्याबाबत सारासार व सखोल विचार करून पुन्हा नवनिर्मितीसाठी सज्ज व्हायचे.

लक्षात ठेवा आपली एक आयडिया नक्कीच आपली दुनिया बदलू शकते. म्हणूनच नवनिर्मितीचा छंद मनाला लावल्यास यशाचा आलेख उंचावणारच यात शंका नाही.

क्रमश:


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)