आयडीबीआय विकण्याच्या हालचाली वाढल्या

नवी दिल्ली : आयडीबीआय बॅंकेची विदारक अवस्था पाहता बॅंकेच्या भागभांडवलाला खासगी क्षेत्रातून एअर इंडियासारखे भाव पाडून मागितले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकार या बॅंकेला एलआयसीकडे सोपविण्याचा मार्ग अवलंबवित असल्याचे बोलले जात आहे. यामुळे एलआयसीच्या पैशाचा दुरुपयोग केल्यासारखे होणार आहे.सरकारकडे या बॅंकेचे 80.96 टक्‍के इतके भागभांडवल आहे. त्यातील एलआयसी 50 टक्‍केपेक्षा जास्त भागभांडवल विकत घेण्याची शक्‍यता असल्याचे सांगीतले जाते. यासाठी एलआयसीला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. एलआयसीला बॅंकिंग व्यवसायात जाण्याची इच्छा असल्याचे सरकारकडून भासविले जाणार आहे.

कालपर्यंत अर्थमंत्रालयाचे अधिकारी या घटनाक्रमाबाबत कानावर हात ठेवीत आले आहेत. कालच या बाबीकडे लक्ष वेधले असता अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एलआयसी आणि आयडीबीआय बॅंकेचे स्वतंत्र संचालक मंडळ आहे. त्यामुळे जे काही करायचे असेल ते करायचा अधिकार मंडळाना आहे. यात सरकारची काही भूमिका असण्याची गरज नाही. मात्र पडद्याआडून सरकार निर्गुंतवणूकीचे उद्दीष्ट पार पाडण्यासाठी या हालचाली करीत असल्याचे बोलले जाते.
आयडीबीआयचे भलेमोठे एनपीए एलआयसीला पेलेल का? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अगोदरच एलआयसी म्युच्युअल फंडात आणि गृह वित्त क्षेत्रात कार्यरत आहेच. निर्गुंतवणुकीच्या बाबतीत अडचणीत आल्यानंतर सरकारने एलआसीचा वापर एटीएमसारखा अनेक वेळा केला आहे. कोल इंडियासारख्या निर्गुंतवणूकीच्यावेळी ऐनवेळी एलआयसीने मोठ्या प्रमाणात खरेदी करून सरकारला वाचविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयडीबीआय बॅंकेचे ढोबळ एनपीए 55600 कोटी रुपये तर तोटा 5600 कोटी आहे. शेअरच्या भावानुसार बॅंकेचे बाजार मूल्य केवळ 23 हजार कोटी रुपये आहे. तर रियल इस्टेट व इतर गुंतवणूकविषयक मालमत्ता 20 हजार कोटी रुपये आहे. बॅंकेची एकूण परिस्थिती पाहता बाजारमूल्य फारच कमी आहे. आयडीबीआयच्या शेअरला खाजगी क्षेत्रातील कंपन्या हात लावणार नाहीत. म्हणून ही बॅंक एलआयसीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनाक्रमानंतर बॅंकेच्या शेअरच्या किमती आज 7 टक्‍क्‍यानी कमी होऊन 54.50 रुपयावर आल्या.

अर्थसंकल्पातच सरकारकडून 50 टक्‍केपेक्षा जास्त भागभांडवल विकण्याची शक्‍यता खुली ठेवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात एअर इंडियाचा विक्रीचा अयशस्वी प्रयोग सरकारकडून करण्यात आला. आता एलआयसी जर बॅंकेचे 50 टक्‍केपेक्षा जास्त भागभांडवल घेणार असेल तर एलआयसीच्या स्पर्धक कंपन्याही आयडीबीआय बॅंकेच्या भाग भांडवलासाठी प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. कारण तसे झाले तर एलआयसीच्या शाखा पाहता एलआयसीचे पारडे जड होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)