जम्मू काश्‍मीरमध्ये बर्फवृष्टी 

120 जणांना वाचवण्यात यश

जम्मू – जम्मू काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या बर्फवृष्टीमुळे मुगल रोडजवळील पीर की गली भागात अनेक वाहने बंद पडली. या वाहनांच्या चालकांना अचानक थंडी तापाची लागण झाल्याचे आढळून आले. यापैकी बहुसंख्य ट्रक चालक होते. या सर्वांना रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ही केवळ बर्फवृष्टीमुळे तापाची लक्षणे असून त्यात काहीही गंभीर नसल्याचे वाहतुक विभागाचे पोलिस उपाधिक्षक मोहंम्मद रफिक यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुगल रोड हा सर्वसाधारणपणे हिवाळ्यात बंद असतो. याच रस्त्यावरील पीर की गली भागात रस्त्यांवर तीन फुटांपर्यंत बर्फ साचून राहिले आहे. राजौरी आणि पूंछ या जोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावरून मोठी वाहतुक दररोज होत असते. बर्फ साचल्यामुळे सुमारे 70 ट्रक या रस्त्यावर बंद पडले. या रस्त्याच्या दुतर्फा असे बंद पडलेले ट्रक सोडून 120 चालकांनी जवळच आश्रय घेतला होता. यामध्ये 60 वर्षीय एका वृद्धेचाही समावेश आहे. वाहने बंद पडल्याने बर्फवृष्टीत अडकलेल्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू श्रीनगर महामार्गावर दरडी कोसळण्याने हा महामार्ग आज सकाळी काही तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. रात्रभर पाऊस पडल्याने अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)