#ICCWorldCup2019: सहभागी संघ आणि त्यांची कामगिरी

इंग्लंड : 2015 सालच्या विश्‍वचषकातील निराशाजनक कमागिरीनंतर इंग्लंडने गेल्या चार वर्षांमध्ये आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली. लढण्याची वृत्ती, खेळाडूंची प्रगती यामुळे यंदा इंग्लंड सर्वात धोकादायक संघ बनला आहे. आक्रमक फलंदाजी आणि अष्टपैलू खेळाडूंची फळी यामुळे इंग्लंड क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहचला आहे. त्यातच त्यांनी विश्‍वचषकापुर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली असुन ते सध्या संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी फोचले आहेत.

अव्वल खेळाडू : जॉनी बेयरस्टॉ, जो रुट, जोस बटलर.
एक्‍स फॅक्‍टर : बेन स्टोक्‍स आणि मोईन अली.


भारत : स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारताकडे तंत्रशुद्ध आणि उच्च दर्जाच्या फलंदाजांची फळी असून गोलंदाजीमध्ये सर्वात बलाढ्य संघ म्हणुन भारताकडे पाहिले जात आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षांचे ओझे यशस्वीपणे पेलण्याचे मुख्य आव्हान भारतीय संघापुढे असेल. यावेळी सराव सामन्यांमध्ये भारतीय संघातील सलामीवीरांनी आणि कर्णधार विराट कोहलीने अपेक्षित कामगिरी केली नसली तरी मधल्या फळीने दोन्ही सामन्यात संघाला तारल्याने विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघ संतुलित संघ म्हणुन जातो आहे.

अव्वल खेळाडू : विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह.
एक्‍स फॅक्‍टर : हार्दिक पांड्या आणि विजय शंकर.


ऑस्ट्रेलिया: गतविजेते ऑस्टेललिया गेल्या 18-20 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हेलकावे खात आहेत. विशेष करुन दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर ऑसट्रेलिया संघ स्थिरावण्यास झगडत आहे. परंतु, स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर त्यांच्या संघाला नवी उर्जा मिळाली असल्याचे दोन्घी सराव सामन्यात अढळुन आले असले तरी संघात पुनरागमन केल्यानंतर वॉर्नरला अपेक्षित कामगिरी करताअ आली नसल्याने त्याला अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा कमीच आहे. त्याच बरोबर सध्या त्यांचा संघ भेदक गोलंदाजांनी भरपुर असल्याने तेही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
अव्वल खेळाडू : स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क
एक्‍स फॅक्‍टर : ग्लेन मॅक्‍सवेल.


बांगलादेश: याआधीच्या तुलनेत बांगलादेशने आपला खेळ अधिक उंचावला आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता असून आता अनुभवही वाढला आहे. याजोरावर ते नक्कीच छाप पाडतील. पण यासाठी त्यांना पूर्ण सांघिक खेळ आणि लक्षपूर्वक खेळ करावा लागेल.

अव्वल खेळाडू : शाकिब अल हसन, मुस्तफिकुर रहिम, तमिम इक्‍बाल.
एक्‍स फॅक्‍टर : मुस्तफिझुर रहमान.


अफगाणिस्तान: क्रिकेटमधील त्यांची प्रगती सातत्याने सुरु आहे. स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी त्यांना झुंजावे लागले, पण अखेर त्यांनी यश मिळवले आणि आता ते छाप पाडण्यास उत्सुक आहेत. कोणतेही दडपण नसल्याने त्यांच्यासाठी यंदाची स्पर्धा एक सहल ठरु शकते किंवा साखळी फेरीत ते काही अनपेक्षित निकालही नोंदवू शकतील. तसेच त्यांनी पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानसारख्या तगड्या संघाला पराभवाची धुळ चारत आपल्याला कोणत्याही संघाने कमी लेखु नये अशी जनु धमकीच दिली आहे. त्यामुळे इतर संघांना अफगाणिस्तान पासुन सावध रहावे लागणार आहे.

अव्वल खेळाडू : मोहम्मद शाहझाद, मोहम्मद नबी.
एक्‍स फॅक्‍टर : राशिद खान.


वेस्ट इंडिज: नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्याने कमी क्रमवारीच्या वेस्ट इंडिजकडे धोकादायक संघ म्हणून पाहिले जात आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच विजयी लय मिळाली, तर विंडीज संघ सर्वांसाठीच डोकेदुखी बनेल. संघातील काही विस्फोटक खेळाडूंच्या जोरावर ते आपला दबदबा निर्माण करु शकतात. फिरकी गोलंदाजीत विंडीज संघ कमजोर आहे. तरीही त्यांनी सराव सामन्यात न्युझीलंदसमोर 421 धावांची मजल मारत आपन यंदा 500 धावांचा टप्पा गाठण्यास ते उत्सुक असल्याचेही दाखवून दिले आहे.

अव्वल खेळाडू : ख्रिस गेल, शाय होप, जेसन होल्डर.
एक्‍स फॅक्‍टर : आंद्रे रसेल.


न्यूझीलंड: संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत डार्कहॉर्स म्हणुन ओळख असणाऱ्या न्युझीलंड संघाला स्पर्धेतील एक बलाढ्य संघ नाकारता येणार नाही. त्यांच्याकडे अनुभवी आणि आक्रमक फलंदाज असून अप्रतिम अष्टपैलू खेळाडू व वेगवान गोलंदाजही आहेत. फिरकी गोलंदाजीत त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. मात्र, त्यांनी आपल्या वेगवान गोलंदाजांच्या बळावर भारतीय संघाला पहिल्या सराव सामन्यात अक्षरशः पअणी पाजले होते. मात्र, त्यांच्या बेभरवशाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तब्बल 421 धावांची खिरापत वाटली होती. त्यामुळे विजेतेपद मिळवायचे असल्यास त्यांना कामगिरीत समतोल साधावा लागणार आहे.

अव्वल खेळाडू : केन विलियम्सन, रॉस टेलर, मार्टिन गुप्टिल.
एक्‍स फॅक्‍टर : ट्रेंट बोल्ट.


दक्षिण आफ्रिका: एबी डिव्हिलियर्सच्या अचानक निवृत्तीने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सर्व अडचणींवर मात करत अव्वल संघ विश्‍वचषकात उतरवणाऱ्या दक्षिण अफ्रिके समोर बेभरवशाच्या फलंदाजीची अडचण असणार आहे. मात्र, गोलंदाजी मजबूत असून क्षेत्ररक्षण अपेक्षेप्रमाणे शानदार होईल. यावेळी त्यांनी दोन्ही सराव सामन्यांमध्ये झकास सुरूवात करत प्रतिस्पर्धी संघांना आव्हान निर्माण केले असुन यंदा त्यांच्याकडेही विजेतेपदाचे मजबूत दावेदार म्हणुन पाहिले जाऊ लागले आहे.

अव्वल खेळाडू : फाफ डूप्लेसिस, हाशिम आमला, कागिसो रबाडा.
एक्‍स फॅक्‍टर : क्विंटन डीकॉक.


श्रीलंका: संघातील दिग्गज फलंदाज आणि गोलंदाजांनी निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हा संघ झगडत आहे. सातत्याने बदलत राहणारे नेतृत्त्व आणि खेळाडू यामुळे लंका संघाला फार फायदा झालेला नाही. तरीदेखील या संघामध्ये आश्‍चर्यकारक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. त्यांना गृहीत धरणे प्रतिस्पर्धी संघाला महागातही पडू शकेल.

अव्वल खेळाडू : अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, दिमुथ करुणारत्ने.
एक्‍स फॅक्‍टर : धनंजय डी’सिल्व्हा.


पाकिस्तान: क्रिकेट खेळातील सर्वात बेभरवशाचा संघ म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. एखाद्या दिवशी चमकदार खेळ करणारा हा संघ दुसऱ्या दिवशी सपशेल अपयशीही ठरतो. त्यांच्याकडे नैसर्गिक खेळ करणाऱ्या खेळाडूंची कोणतीही कमी नाही. जेव्हा त्यांचा दिवस असतो, तेव्हा पाकिस्तानसारखा धोकादायक प्रतिस्पर्धी इतर कोणीही नसतो. मात्र, त्यांना अफगाणिस्तानसमोर अपयशाचा सामना करावा लागल्याने आगामी स्पर्धेत समतोल कामगिरी नोंदवावी लागणार आहे.

अव्वल खेळाडू : सर्फराझ अहमद, बाबर आझम, मोहम्मद आमिर.
एक्‍स फॅक्‍टर : फखर झमान.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)