#ICCWorldCup2019: जो रूटची नाबाद शतकी खेळी; इंग्लडचा ८ विकेट राखून विजय

साउदम्पटन: आक्रमक फलंदाजाची मांदियाळी असूनही वेस्ट इंडिजला 44.4 षटकांमध्ये 212 धावांमध्ये रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळाले. त्याचा पाठलाग करतांना इंग्लडने हा सामना 33.1. षटकांमध्ये आठ विकेट राखून जिंकला. जो रूटने धमाकेदार शतक झळकवले.

वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याने शैलीदार खेळ करीत 63 धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला. ख्रिस गेल या धोकादायक फलदाजासह विंडीजचे पहिले तीन गडी 55 धावांमध्ये बाद झाले. गेल व जोफ्रा आर्चर यांच्यात येथे झुंज अपेक्षित होती.मात्र तशी लढत होण्यापूर्वीच गेल बाद झाला. गेल याने पाच चौकार व एक षटकारासह 36 धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लीयाम प्लंकेट्‌च्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो याने त्याला सुरेख टिपले. पूरन व शिमोरन हेटमेयर यांनी संघाची घसरगुंडी थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भर घातली. हेटमेयर याने चार चौकारांसह 39 धावा केल्या. जो रूट याने स्वत:च्या षटकात त्याचा झेल घेत ही जोडी फोडली. पाठोपाठ त्याने जेसन होल्डर यालाही याच प्रकारे बाद करीत वेस्ट इंडिजला पुव्हा अडचणीत टाकले. या धक्‍क्‍यातून वेस्ट इंडिजला सावरता आले नाही. नंतर विंडीजकडून मोठी भागीदारी झाली नाही. पूरन याने तीन चौकार व एक षटकारासह 63 धावा केल्या. त्याला जोफ्रा आर्चर याने बाद केले. आंद्रे रसेल याने दोन उत्तुंग षटकार ठोकले मात्र, तो 21 धावा काढून तंबूत परतला. झंझावती फटकेबाजीबाबत ख्यातनाम असलेल्या कार्लोस ब्रेथवेट यानेही निराशाच केली. केवळ चौदा धावा काढून त्याने तंबूचा रस्ता पकडला. इंग्लंडकडून मार्क वुड याने किफायतशीर मारा करीत तीन गडीही बाद केले. जोफ्रा आर्चर यानेही तीन विकेट्‌स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक- वेस्ट इंडिज- 44.4 षटकात सर्वबाद 212 (ख्रिस गेल 36, निकोलस पूरन 63, शिमोरन हेटमेयर 39, आंद्रे रसेल 21, मार्क वुड 3-18, जोफ्रा आर्चर 3-30, जो रूट 2-27)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)