अफगाणिस्तानवर सात गडी राखुन विजय
टॉटन – जेम्स निशाम आणि लाॅकी फर्ग्यूसनने केलेल्या भेदक गोलंदाजी नंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलरच्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा सात गडी राखुन पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयीलय कायम राखली आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 41.1 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने हे लक्ष्य 32.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावा करुन पुर्ण करत विश्वचषक स्पर्धेत लागोपाठ तिसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रत्युत्तरात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरूवात खराब झालेआ. सलामीवीर मार्टिन गुप्टिल पहिल्याच चेंडूवर एकही धाव न करता परतला. यानंतर आलेल्या केन विल्यम्सन आणि कॉलिन मुन्रोयांनी सावध फलंदाजी करत न्युझीलंडचा डाव सावरायला सुरूवात केली. यादोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली. मुनरा 24 चेंडूंमध्ये 22 धावा करुन अफताबच्या चेंडूवर हामिदकडे झेल देत बाद झाला.
यानंतर आलेल्या रॉस टेलरला साथीत घेत कर्णधार विल्यम्सनने न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघांनीही न्युझीएलंडला शंभरी ओलांडून दिली. हे दोघेच न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवून देतील असे वाटत असतानाच अफताबने टेलरला त्रिफळाचीत केले. यावेळी टेलरने 52 चेंडूत 48 धावांचे महत्वपुर्ण खेळी करत विल्यम्सनच्या साथीत 89 धावांची महत्वपुर्ण भागिदारी नोंदवली. यानंतर आलेल्या टॉम लॅथमच्या साथीत केन विल्यम्सनने संघाची आणखीन पडझड न होवू देता न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी विल्यम्सनने विल्यमसनने 99 चेंडूंमध्ये 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 79 आणि टॉम लाथनने 18 चेंडूंमध्ये नाबाद 13 धावा केल्या.
तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करायला उतरलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी लोकी फर्ग्यूसन आणि जेम्स निशाम या न्युझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. निशामने 10 षटकांमध्ये 31 धावा देत 5 तर फर्ग्यूसनने 9.1 षटकांमध्ये 37 धावा देऊन अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना माघारी धाडले. सलामीवीर हजरातुल्लाह जजाई (34) आणि नूर अली जदरान (31) यांनी अफगाणिस्तानच्या संघाला उत्तम सुरूवात करून देत 10.5 षटकांमध्ये 66 धावांची भागिदारी केली. यानंतर 66 धावांवरच अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर आणि रहमत शाह यांना माघारी धाडले. हशमतुल्लाह शाहिदीने अर्धशतकी खेळी खेळत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. त्याने 99 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळी केली. अखेर अफगाणिस्तानच्या संघाला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.