#ICCWorldCup2019 : इंग्लंडचा अफगाणिस्तानवर एकतर्फी विजय

लंडन – गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानचा 9 गडी आणि 195 चेंडू राखुन पराभव केला. विश्‍वचषकापुर्वी आयोजीत केल्या गेलेल्या सराव सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला आपला पहिला सराव सामना गमवावा लागला होता. त्यानंतर आजच्या सामन्यात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात उत्तम कामगिरी करत इंग्लंडने विश्‍वचसकापुर्वी जोरदार पुनरागमन केले आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 38.4 षटकांत सर्वबाद 160 धावांची मजल मारत इंग्लंडसमोर विजयासाठी 161 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. इंग्लंडने हे लक्ष्य केवळ 17.3 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात 161 धावा करत पुर्ण करुन अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव केला.

यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने धमाकेदार सुरूवात केली. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्ट्रोने पहिल्या चेंडू पासुन अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवल्याने अफगाणिस्तानचा संघ सुरूवातीलाच दबावात आला होता. यावेळी रॉय आणि बेयरस्ट्रो हे षटकामागे 10 च्या सरासरारेने फटकेबाजी करत असल्याने अफगाणिस्तानने तिसऱ्या षटकात रशिद खानला तर चौथ्या षटकात नबीला गोलंदाजीला आणले मात्र, यावेळी दोघांच्याही गोलंदाजीवर इंग्लंडचे सलामीवीर फटकेबाजी करत होते.

मात्र, आठव्या षटकांत नबीच्या चेंडूवर पुढे येत मोठा फटका खेळण्याच्या नादात बेयरस्ट्रो स्टम्पिंग बाद झाल्याने अफगाणिस्तानला पहिला बळी मिळाला. मात्र, यानंतरही रॉयने फटकेबाजी सुरूच ठेवली. यावेळी बेयरस्ट्रो बाद झाल्यानंतर आलेल्या जो रुटने सावध पवित्रा आजमावला होता. मात्र, रॉयने फटकेबाजी करत आपल्या अर्धशतकासह इंग्लंडला आठराव्या षटकांतच विजय मिळवून दिला. यावेळी रॉयने 46 चेंडूत नाबाद 89 तर रुटने नाबाद 29 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करनार्या अफगाणिस्तानच्या संघातील मोहम्मद नबी आणि नुर अली झारदान वगळता इतर फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता न आल्याने अफगाणिस्तानला 160 धावांवरच समाधान मानावे लागले. यावेळी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि जो रुट यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)