ICC Women’s World T20 : जाणून घ्या.. भारतीय महिला संघाचे सामन्याचे वेळापत्रक

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघ वेस्टइंडीजमध्ये 9 नोव्हेंबर ते  24 नोव्हेंबर दरम्यान वेस्टइंडीजमध्ये  आयसीसी टी20 विश्वचषक खेळणार आहे.

भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना 9 नोव्हेंबर गयाना मध्ये न्यूझीलंड विरूध्द खेळणार आहे. भारतीय संघाचा ग्रूप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारतासह आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान, आयरलंड आणि न्यूझीलंड महिला संघाचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वीच्या म्हणजेच 2017 सालच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत भारतीय महिला संघाने मजल मारली होती. अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाला इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाचा विश्वचषक जिंकण्याचा  भारतीय महिला संघाचा इरादा असणार आहे.

भारतीय महिला संघाचे टी20 विश्वचषकातील सामने खालील प्रमाणे –

पहिला सामना  भारत वि न्यूझीलंड, 9 नोव्हेंबर.
दुसरा सामना भारत वि. पाकिस्तान, 11 नोव्हेंबर.
तिसरा सामना भारत वि. आर्यलंड, 15 नोव्हेंबर.
चौथा सामना भारत वि. अाॅस्ट्रेलिया, 17 नोव्हेंबर.

सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)